वर्धा - आनंदनगर-अशोकनगर येथील फुलफैलवासीयांना कायमस्वरूपी घटरपट्टे देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सोमवारी फुलफैल परिसरातून राष्ट्रीय सम्बुद्ध महिला संघटनेच्या शारदा झामरे याच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. परिसरातील इतवारा आंबेडकर पुतळ्याजवळून हा मोर्चा गेला. त्यांनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
आनंदनगर अशोकनगर आणि फुलफैल हे या भागात मागील तीन पिढ्यांपासून राहत असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. यात ही जागा इंग्रज काळात गोरक्षणाला गायी-गुरे चारण्यासाठी दिली होती. मात्र, अनेक वर्षांपासून इथे झोपडपट्टी वसलेली आहे. ४० वर्षांपूर्वी हा भाग झोपडपट्टी म्हणून घोषित झाला आहे. मात्र, आता गोरक्षण संस्थेला या जागेला २० पैसे चौरस फूट प्रमाणे विकण्याची परवानगी धर्मादाय आयुक्तांकडून देण्यात आली आहे. परवानगी २० पैशांनी असताना चक्क १०० रुपये चौरस फुटाने जागा विकत असल्याचा आरोप केला जात आहे.
हेही वाचा - वर्ध्यात साडेदहा किलो गांजा जप्त; दोघांना अटक ही जागा विकत न घेता इथे राहणाऱ्या नागरिकांना कायम स्वरुपी पट्टे देण्याची मागणी या आंदोनच्या निमित्ताने करण्यात आली आहे. आज निवेदन देत या मगणीला रेटून धरण्यात आले आहे. लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय या आंदोलनादरम्यान काही बरेवाईट झाल्यास शासन जवाबदार राहील, असेही यावेळी आंदोलकांच्या वतीने शारदा झामरे यांनी सांगितले. हेही वाचा - वर्ध्याच्या धोत्रा-अल्लीपूर मार्गावर दुचाकीची समोरासमोर धडक; एक जागीच ठार