• A
  • A
  • A
वर्ध्यात साडेदहा किलो गांजा जप्त; दोघांना अटक

वर्धा - आंध्र प्रदेशातून तस्करी केला जात असलेला तब्बल साडेदहा किलो गांजा वर्धा बसस्थानकावर जप्त करण्यात आला आहे. बसने शनिवारी हा गांजा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे.


हेही वाचा - वर्ध्याच्या धोत्रा-अल्लीपूर मार्गावर दुचाकीची समोरासमोर धडक; एक जागीच ठार

अब्दुल राजी अब्दुल जब्बा आणि प्रवीण धर्माळे दोघेही अमरावती येथील रहिवासी असून पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधाराने त्यांना ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान कॉलेज बॅगमध्ये अंदाजे किंमत १ लाख रुपये किमंतीचा साडेदहा किलो गांजा सापडला. एनडीपीएस अंतर्गत त्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशतील अनेक जिल्ह्यामध्ये गांजाची शेती केली जात असल्याचे अनेकदा समोर आले होते. हाच गांजा सीमापार तस्करी करत महाराष्ट्रातील अनेक भागात पोहोचवला जात आहे.

हेही वाचा - धुळ्यात १६५ किलो कोरडा गांजा जप्त; आरोपी फरार



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES