• A
  • A
  • A
वर्ध्याच्या धोत्रा-अल्लीपूर मार्गावर दुचाकीची समोरासमोर धडक; एक जागीच ठार

वर्धा - हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा ते अल्लीपूर या मार्गावर रविवारी सायंकाळी २ दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. योगेश कलोडे (वय ३०), असे मृत युवकाचे नाव आहे.


हेही वाचा - भीमाशंकरजवळ मंदोशी घाटात पीकअप गाडीचा अपघात; ३ जण गंभीर जखमी

मृत योगेश आणि त्याचा भाऊ संदीप कलोडे हे दोघे वर्ध्यावरून दुचाकीने (MH ३२ AA १०२०) अल्लीपूरला जात होते. तर सुरज ढोबळे (वय २६) वर्ष दुचाकीने (MH ३२ AC ९८६६) धोत्र्याला जात होता. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक बसली.

हेही वाचा - भीमाशंकर मार्गावर भाविकांच्या खासगी बसला अपघात, ४ जण गंभीर तर २६ किरकोळ जखमी

सुरज ढोबळे आणि संदीप कलोडे दोघाना गंभीर जखमी अवस्थेत सेवाग्राम रुग्णालय नेण्यात आले. अल्लीपूर पोलीस ठाण्याचे पीएसआय राजू चौधरी यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला.

हेही वाचा - 'वाह रे सरकार तेरा खेल, मांगा न्याय मिला जेल..!' भुजबळांचा भाजपवर निशाणा
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES