• A
  • A
  • A
शरद पवार हुशार राजकारणी, 'यंदा जमणार नाही' त्यांना माहीत आहे - गडकरी

नागपूर - शरद पवार हे हुशार राजकारणी आहेत, यावेळी काही जमणार नाही, त्यांना माहीत आहे. म्हणून त्यांनी हे सगळे जाणून माघार घेतली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. शरद पवारांच्या निवडणूक न लढण्याच्या निर्णयावरून सध्या राज्यात जोरदार चर्चा होत आहे. यावर गडकरींनी प्रतिक्रिया देत पराभवाचा अंदाज आल्यानेच पवारांनी माघार घेतल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा -नागपूरची निवडणूक होणार चौरंगी; विदर्भवाद्यांची पहिली यादी जाहीर
आज पर्यंतच्या इतिहासात सरकारने जलसंवर्धनासाठी इतका निधी कधी दिला नाही. देशात जलसंवर्धनाचे सर्वात उत्कृष्ठ काम महाराष्ष्ट्रात झाले आहे. सरकारची ही पहिली ५ वर्षे आहेत, ज्यात सर्वाधिक जलसंवर्धनाचे कामे झाली आहेत, जे गेल्या २५ वर्षात झाली नव्हती, असेही गडकरी म्हणाले.
हेही वाचा -'शरद पवारांना फक्त शिवसेना-भाजपात घेऊ नका, मग आम्ही टीका करायची कोणावर ?'
उद्धव ठाकरेंच्या विषयी बोलताना ते म्हणाले की, दलित समाजाला भीती दाखविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. ते जातीवादक आहेत, ते हिंदुत्ववादी आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनी कधी जातीवादक काम केले नाही, उमेदवाराला कधी तिकीट देण्यासाठी त्यांनी जातीचा विचार केला नाही.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES