• A
  • A
  • A
काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला आव्हान; स्थगिती देण्याची मागणी

नागपूर - काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या निवडणुकीविरुद्ध डॉ. राजीव पोतदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. ऑक्टोबर-२०१९ मध्ये विधानसभेची सर्वसाधारण निवडणूक असल्यामुळे ही पोटनिवडणूक घेऊन मनुष्यबळ, वेळ, ऊर्जा व सरकारी निधी व्यर्थ घालवू नये, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या याचिकेवर सोमवार सुनावणी होण्याची शक्यता आहे.

डॉ. राजीव पोतदार


लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकीसोबत काटोल विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने गत १० मार्चला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, ११ एप्रिलला मतदान होणार असून २३ मेला निकाल जाहीर केला जाणार आहे. पोटनिवडणूक जिंकणाऱ्या उमेदवाराला आमदार म्हणून कार्य करण्यासाठी केवळ तीन महिन्याचा कालावधी मिळेल. एवढ्यासाठी मनुष्यबळ, वेळ, ऊर्जा व सरकारी निधी खर्च करणे उचित होणार नाही. पोटनिवडणुकीनंतर मतदार व इच्छूक उमेदवारांना लगेच सर्वसाधारण निवडणुकीला सामोरे जावे लागेल. पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमावर स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.
डॉ. आशिष देशमुख यांच्या राजिनाम्यामुळे जागा रिक्त झाली आहे. १५ ऑक्टोबर २०१४ ला झालेल्या सर्वसाधारण विधानसभा निवडणुकीत काटोल मतदार संघातून आशिष देशमुख विजयी झाले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती. दरम्यान, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन ३ ऑक्टोबर २०१८ ला आमदारकीचा राजिनामा दिला. ६ ऑक्टोबर २०१८ ला त्यांचा राजिनामा मंजूर झाला.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES