• A
  • A
  • A
नागपूर- लोकसभा निवडणुकीपूर्वीच नागपुरातील काँग्रेस नेत्यांची गटबाजी उघड

नागपूर - काँग्रेस पक्षाचे नागपुरातील अधिकृत उमेदवार नाना पटोले पहिल्यांदाच नागपुरात आल्यानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र, या स्वागत कार्यक्रमाकडे शहरातील प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. यामुळे शहरातील काँग्रेस नेत्यांची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.


हेही वाचा - काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचे नागपुरात जंगी स्वागत
कधीकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या नागपुरात काँग्रेसची येथील मतदारांवर जबरदस्त पकड होती. मात्र, विविध नेत्यांच्या गटबाजी मुळे आज नागपुरातील काँग्रेसची स्थिती कमजोर झाली आहे. चार टोकाला चार नेत्यांची तोंडे असल्याने इथला काँग्रेसचा पारंपरिक मतदार काँग्रेसपासून दुरावला आहे. आज नागपूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहिल्यांदाज त्यांचे नागपूरला आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर शेकडो कार्यकर्ते जमले होते. मात्र, नागपुरातील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या स्वागताकडे पाठ फिरवली.
हेही वाचा - नागपुरात रोजगार भरती ही मतांसाठी की बेरोजगारांसाठी;आरोग्य कर्मचाऱ्यांचा सवाल
पटोले येथून 3 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा करणारे विलास मुत्तेमवारसुद्धा यावेळी अनुउपस्थित होते. या शिवाय माजी मंत्री नितीन राऊत यांनीदेखील स्वागताला येण्याचे टाळले. अशा गट-तटाच्या राजकारणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातसुद्धा संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES