• A
  • A
  • A
नागपुरात दोन गटात राडा.. जमावाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू

नागपूर - शहरातील गुलशननगरमध्ये दोन गटाच्या भांडणात एका तरुणाचा मृत्यू झाला. शेख इरफान अब्दुल रज्जाक (रा. वनदेवीनगर) असे भांडणात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे.


हेही वाचा - पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राची निर्घृणपणे हत्या; गुप्तांगही...
इरफान हा त्याच्या ओळखीच्या पाल नावाच्या मित्राच्या दारूच्या अड्ड्यावर गेला होता. त्यावेळी तिथे २ गटात भांडणे झाली. या भांडणात एका तरुणाने इरफानच्या कानशिलात लावली. या घटनेमुळे इरफान दुखावला आणि वनदेवीनगरमध्ये परत गेला. यानंतर इरफान आपल्या चार साथीदारांना घेऊन परत गुलशननगरमध्ये आला. मात्र, यावेळी तिथे उभ्या असलेल्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात गुलशनचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हेही वाचा - अनिकेत कोथळे खून प्रकरण : ७६ दस्ताऐवजांची यादी न्यायालयात सादर
घटनेची माहिती समजताच कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि परिमंडळ-५ चे उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES