• A
  • A
  • A
नितीन गडकरींचा ३ लाख मतांनी पराभव होईल, विलास मुत्तेमवारांचा दावा

नागपूर - नितीन गडकरी हे मोदी लाटेत निवडून आले होते. मात्र, यावेळेस मोदी लाट ओसरली असून ते तोंडघशी पडतील असा दावा काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. गडकरींना स्वत:ची लाट निर्माण करता आली नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोल हे ३ लाखाच्या मताधिक्क्याने निवडूण येतील असेही मुत्तेमवार म्हणाले.



नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी विजयाचा दावा करत आहेत. मात्र, यावेळच्या निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागेल असा दावा काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. २०१४ च्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच लोकसभेची लढवली होती. त्यावेळेस गडकरींनी विलास मुत्तेमवार यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करून पहिल्यांदाच संसदेची पायरी चढली होती. यावेळेस काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विलास मुत्तेमवार यांना डावलून नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रचार करण्याची नैतिक जबाबदारी ही विलास मुत्तेमवार यांच्यावर आहे.

निवडणुकीचा प्रचार सुरू होण्याआधीच विलास मुत्तेमवार यांनी दावे-प्रतिदावे सुरू केले आहेत. नितीन गडकरींनी २९ वर्षात निवडणूक लढवण्याचं कधीही धाडस केले नाही. गेल्या वेळेस ते मोदी लाटेत निवडूण आले होते. मात्र, आता ती लाट ओसरली असून नितीन गडकरींचा ३ लाखांच्या मताधिक्याने पराभव होईल असे मुत्तेमवार म्हणाले.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES