• A
  • A
  • A
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींना शस्त्रांसह अटक

नागपूर - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींना शस्त्रांसह अटक करण्यात पाचपावली पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून तलवार आणि चाकूसह काही इतरही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. इंद्रजीत उर्फ इंदल बेलपारधी, नामदेव बाळकृष्ण निनावे, सुखदेव निखारे, रोहित नारकर आणि मनीष वर्मा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


हेही वाचा - अल्पवयीन मुलींचे अश्लील फोटो बनवून करायचा ब्लॅकमेल; आरोपीला अहमदाबादेतून अटक
पोलीस उपनिरीक्षक अनंतराव बडकर हे आपल्या स्टाफसह रात्र गस्तीवर होते. यावेळी त्यांना मोतीबाग परिसरातील शिवमंदिराच्या मागील गल्लीत काही लोक संशयास्पदरित्या अंधारात बसून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला आणि या आरोपींना अटक केली.
हेही वाचा - शेळी चोरीचा संशय, जमावाच्या मारहाणीत मजुराचा मृत्यू
पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि एक तलवार यासह सह दरोड्यात उपयोगी येणारे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES