• A
  • A
  • A
नाना पटोलेंना काँग्रेसने उमेदवारी देऊ नये ; बहुजन समाजाची मागणी

नागपूर - लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नागपुरातील बहुजन समाजाने पटोले यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे पटोले यांची उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा - मी माझ्या घरातील बालहट्ट पुरवू शकतो - शरद पवार
खैरलांजी हत्याकांडावेळी पटोले यांची भूमिका आरोपींना मदत करणारी असल्याचा आरोप बहुजन समाजातर्फे करण्यात येत आहे. काँग्रेसने त्यांना उमेदवारी देऊ नये, याकरता बहुजन समाजाचे वर्चस्व असलेल्या उत्तर नागपुरातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना ई-मेल पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा - आदित्यच्या उमेदवारीसंदर्भात उद्धव ठाकरेच निर्णय घेतील - संजय राऊत
नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात कोणता उमेदवार उतरवावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस पक्षश्रेष्ठीने सल्लामसलत करून पटोले यांना उमेदवारी देण्याचा विचार पक्का केला. मात्र, पटोलेंच्या नावाला अनुसूचित जातीतील काही बुद्धिवंत, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी विरोध सुरू केला आहे. अजूनपर्यंत पटोलेंची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांच्याविरोधात नागपुरात बहुजन समाज एकवटला आहे. जर काँग्रेस पक्षाने पटोले यांना उमेदवारी दिली तर बहुजन समाज त्यांच्या विरोधात मतदान करेल, असा देखील दावा केला जात आहे. यासंदर्भात उत्तर नागपुरातून शेकडो ई-मेल राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांना पाठवण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.
२००६ मध्ये भंडारा जिल्ह्यात घडलेल्या खैरलांजी हत्याकांडानंतर घडलेल्या घडामोडीनंतर पटोले यांनी आरोपीच्या बाजूने भूमिका घेतली होती. त्यावेळी बहुजन समाज नाराज झाला होता. त्या आठवणी अजूनही ताज्या असल्याचे सांगत बहुजन समाजातील विविध घटकांनी पटोले यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे काँग्रेससमोर अडचणी वाढल्या असून काँग्रेस पक्ष श्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES