• A
  • A
  • A
केवळ ४ महिन्यांच्या कार्यकाळासाठी काटोल विधानसभेची पोटनिवडणूक

नागपूर- भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुखांनी बंडखोरी करत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे केवळ चार महिन्यांच्या कालावधीसाठी काटोल येथे पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.


लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाबरोबरच काटोल येथे विधानसभेचीही पोटनिवडणूक होणार आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराला केवळ चार महिन्यांच्या कार्यकाळासाठी आमदारकी भूषविता येणार आहे. त्यानंतर लगेच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे युतीच्या जागावाटापात काटोल मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येतो.

हेही वाचा- भर सभेत काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; मोदींच्या विरोधात 'अश्लील' टीका

मात्र २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख यांनी हे निवडणूक जिंकली होती. मात्र आता आशिष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. इथून त्यांना परत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण आघाडीच्या जागावाटापात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येते आणि तेथून आशिष यांचे काका आणि माजी मंत्री अनिल देशमुख हे अनेक वेळा निवडून आले आहे त्यामुळे आता पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना पैकी कोणता पक्ष आपला उमेदवार देतील या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा- शरद पवारांची माढ्यातून माघार, हा भाजपचा पहिला विजय - सहकारमंत्री देशमुख
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच काटोल विधानसभा पोटनिवडणुकीच्या अधिसूचना ही १८ मार्चला काढली जाईल २५ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज सादर करता येणार आहे तर २८ मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. लोकसभेच्या निकालाप्रमाणे २३ मे ला काटोल विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात येईल.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES