• A
  • A
  • A
११ वर्षीय साचीने रेखाटलेल्या व्यंगचित्राचे केंद्रीय मंत्री गडकरींकडून कौतुक

नागपूर - नागपुरातील चिटनवीस सेंटर येथे आयोजित एका कलात्मक कार्यक्रमात साची या ११ वर्षीय चिमुकलीने नितीन गडकरी यांचे एक व्यंगचित्र काढले. त्या चित्राने गडकरींसह सर्वांची मने जिंकली. गडकरींनी विशेष दखल घेत साचीचे कौतुकही केले.


हेही वाचा - जात पात न बघता योग्य वाटेल त्या उमेदवाराला विचारपूर्वक मतदान करा - नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ख्याती फक्त नागपुरातच नाही तर संपूर्ण देशभरात आहेत. गडकरींचे चाहते त्यांच्यासाठी काही ना काही नवीन उपक्रम राबवत असतात. त्यात गडकरी हे कलेचे रसिकही आहेत. कलारसिकांना ते प्रोत्साहन देतात. यामुळे कलाक्षेत्रातील लोकांच्या गर्दीत गडकरी नेहमीच दिसतात.
हेही वाचा - योगगुरू जनार्दन स्वामींच्या नावाने नागपुरात योग विद्यापीठ व्हावे - नितीन गडकरी
साचीने यापूर्वी देखील अनेक मान्यवरांचे व्यंगचित्र काढले आहेत. २०१७ लाही गडकरी वाड्यावर जाऊन त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने व्यंगचित्र काढले होते. आताच्या व्यंगचित्रामध्ये गडकरी बसले असून त्यांच्या खुर्चीखालून माझी मेट्रो, नागपूर संत्री व नागपूर झिरो हे प्रकल्प तिने दाखवले आहेत.
हेही वाचा - प्रत्येकाने युरिन साठवल्यास देशाचे चाळीस हजार कोटी वाचतील - नितीन गडकरी
साचीने याविषयी बोलताना, नितीन गडकरी यांनी नागपूरचा विकास केला आहे. त्यामुळे या चित्रामध्ये सर्व गोष्टी लक्षात घेऊन ते चित्र काढले असल्याचे तिने सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.