• A
  • A
  • A
मेट्रोच्या कामासाठी १० दिवस बंद राहणार अदिवासी गोवारी शहीद उड्डाणपूल

नागपूर - शहरातील सर्वात लांब असणारा अदिवासी गोवारी शहीद उड्डाणपूल हा मेट्रोच्या कामानिमित्त वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आदिवासी गोवारी उड्डाण पुलावर मेट्रोच्या स्टील गार्डर ब्रिजचे काम सुरू करण्यात येत आहे.


नागपूर मेट्रो रेल्वेच्या रिच-२ कॉरिडॉर अंतर्गत व्हेरायटी चौकाजवळ शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर मेट्रोचे काम सुरू आहे. जमिनीपासून १८.५ मीटर उंचीवर मेट्रोच्या दोन पिलरवर ४०० मीटर लांबीच्या सॅनचे कार्य सुरू आहे. या कार्यासाठी दोन क्रेनचा वापर करण्यात येत आहे. स्टील गार्डरचे काम होत असताना सतत लोखंडी साहित्याचा वापर होणार आहे. त्यातून वाहतुकीस धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस विभागाने कार्य पूर्ण होईपर्यंत आदिवासी गोवारी शहीद उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतची अधिसूचनादेखील वाहतूक विभागातर्फे काढण्यात आली आहे.

स्टील गर्डर ब्रिजच्या कामासाठी पूल बंद राहत असल्याने मॉरिस कॉलेज ते राहटे कॉलनी चौकापर्यंत उडान पुलाखालचा रस्ता किंवा पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रो तर्फे करण्यात आले आहे. हे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी हे काम दिवस-रात्र चालणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना येता काही काळ तरी वाहतुकीच्या समस्यांना समोरे जावे लागणार आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES