• A
  • A
  • A
VIDEO : नागपूरच्या गोळीबार चौकात किरकोळ कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला

नागपूर - पेट्रोल मागितल्याने झालेल्या वादातून नागपुरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फु़टेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्हिडियोमध्ये मयूर डे नावाचा आरोपी पेट्रोल मागणाऱ्या दीपक नामक तरुणावर चाकूने वार करत असल्याचे दिसून येत आहे. जीवघेण्या हल्ल्याची ही घटना शहरातील गोळीबार चौकात घडली होती.सूत्रांच्या माहितीनुसार दीपक नावाचा तरुण शुक्रवारी काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो गोळीबार चौकात आला असता, त्याच्या गाडीतील पेट्रोल संपले. दरम्यान, पेट्रोल पंप दूर असल्याने त्याने शेजारी असलेल्या मयुर नावाच्या तरुणाकडे पेट्रोल पंपापर्यंत जाण्याकरीता पेट्रोलची मागणी केली. यावरून दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर मात्र, अचानक दोघांमध्ये झटापट सुरू झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
हल्लेखोर मयूरने दीपकवर चाकूने वार केले असता, दीपकच्या मित्रांनी मध्यस्थी करून दीपकचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दीपकचा जीव वाचला. त्यानंतर त्यांनी गंभीर जखमी झालेल्या दीपकला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजताच तहसील पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी हाती आलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES