• A
  • A
  • A
नागपूर १५५० किलोची विषमुक्त भाजी, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनासाठी उपक्रम

नागपूर - सेंद्रिय शेतीला चालना मिळावी या उद्देशाने प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज आगळावेगळा प्रयोग केला. लोकांना सेंद्रिय भाज्यांचे महत्त्व कळावे याकरिता त्यांनी १५५० किलोंची भाजी तयार करून ती नागपूरकरांना मोफत वितरीत केली. भाजी मिक्स व्हेज असल्याने यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्यांचा उपयोग करण्यात आला होता.


सध्याच्या धकाधकीच्या काळात कुणालाही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याइतका वेळ नाही. कामाच्या घाईत आपण काय खातो? कसे खातो? त्याचे परिणाम काय होतील, याचा विचारदेखील केला जात नाही. त्यातल्या त्यात बाजारात मिळणाऱ्या भाज्या कुठे उगवल्या जातात? त्या खाल्ल्याने शरीरात कोणते परिणाम होतील? याची देखील जाणीव कुणालाच नाही त्यामुळेच प्रसिद्ध विष्णू मनोहर यांनी आज सेंद्रिय शेतीचे महत्व लोकांना पटावे या उद्देशाने तब्बल १५५० किलोंची भाजी तयार केली आणि ती भाजी नागपूरकरांना नि:शुल्क वितरित देखील केली.

हेही वाचा - उद्योगांना स्वस्त वीज मिळणार, ऊर्जामंत्री बावनकुळेंचे आश्वासन
शेख विष्णू मनोहर यांनी भाजी तयार करण्याकरिता विशालकाय कढईचा वापर केला. भाजी बनवताना ज्या भाज्या त्यांनी उपयोगात आणल्या त्या सेंद्रिय शेतीच्या मार्फत उगवण्यात आल्या असून त्यावर कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी करण्यात आलेली नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याकरिता प्रेरित तर केलेले आहे. याशिवाय लोकांना देखील सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले.
हेही वाचा - नवे मायनिंग धोरण तयार करु - देवेंद्र फडणवीस


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES