• A
  • A
  • A
नवे मायनिंग धोरण तयार करु - देवेंद्र फडणवीस

नागपूर - नवे मायनिंग धोरण तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे मायनिंग प्रोसेसिंग जलद होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशनच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार आशिष जयस्वाल उपस्थित होते.


मायनिंग क्षेत्रात काम करायला प्रचंड वाव आहे. मात्र, ज्या वेगाने काम व्हायला हवे होते, तेवढ्या वेगाने काम झाले नाही, अशी स्पष्ट कबुली त्यांनी यावेळी दिली. आपल्या विदर्भात खनिजसंपत्ती मुबलक प्रमाणात आहे. पण त्या खनिजांवर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे आपल्याकडे कमी आहेत. म्हणूनच सद्याच्या गरजेनूसार नवे मायनिंग धोरण ठरवणार असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांना ड्राफ्ट तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
हेही वाचा - 'या' कारणामुळे पवारांना वाटते गडकरींची काळजी
अवैध वाळू विक्री हा राज्यातील महत्त्वाचा प्रश्न आहे. अति वाळूच्या खणणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या क्षेत्रात याआधी अनेक अपारदर्शी व्यवहार झाले आहेत. त्यामुळे हे क्षेत्र विकासापासून मागे राहीले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, येणाऱ्या अर्थसंकल्पात या क्षेत्राकरिता अतिरिक्त तरतूद करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES