• A
  • A
  • A
विदर्भात थंडीचे पुन्हा एकदा पुनरागमन

नागपूर - विदर्भात थंडीचे पुन्हा एकदा पुनरागमन झाले आहे. २० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला तापमानाचा पारा अचानक १० अंशाच्या खाली आल्याने नागपूरकरांसह संपूर्ण विदर्भवासीयांना हुडहुडी भरली आहे. आज नागपूरचे तापमान ६.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. गेल्या २४ तासात नागपूरचे तापमान ४.७ अंश सेल्सिअसने घटले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.


हेही वाचा-मॉयलचे सीएमडी राष्ट्रपतींपेक्षा मोठे? सरळ करावे लागेल, गडकरींचे खडेबोल
नागपूरमध्ये २९ डिसेंबर २०१८ ला ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली होती. त्यानंतरही थंडी सुरूच आहे. थंडी ओसरून कडाक्याचे ऊन पडायला लागते. त्याचवेळेस अचानक थंडीचे पुनरागमन होते. हा खेळ गेल्या २ महिन्यांपासून सुरू आहे. गेल्या २ दिवसांपासून नागपूरसह विदर्भात थंड वारे वाहत असल्याने तापमानात अनपेक्षित घट झाली आहे. एरवी फेब्रुवारी महिन्यात नागपूर-विदर्भाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत जाते. मात्र, यावर्षी तापमानाचा अंदाज घेणे कठीण झाले आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीस तापमान वाढीस लागले होते. त्यानंतर जानेवारीच्या मध्यंतरी तापमान परत खाली आले. ८ दिवस थंडीचा तडाखा जाणवला होता. त्यानंतर मात्र परत एकदा तापमान वाढले होते. गेल्या २ दिवसांपासून परत एकदा हवामानात बदल झाल्याने थंडी वाढली आहे. नागपूरमध्ये तापमान ६.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. पुढील २ दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असून तापमानात आणखी घट अपेक्षित आहे. मात्र, त्यानंतर परत एकदा तापमान वाढणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा-नागपुरात विदर्भवाद्यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या, कार्यक्रमाला उशीर झाल्याने लोकांची निराशा


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES