• A
  • A
  • A
मॉयलचे सीएमडी राष्ट्रपतींपेक्षा मोठे? सरळ करावे लागेल, गडकरींचे खडेबोल

नागपूर - मॅगनीज ओर इंडिया लिमिटेडचे सीएमडी हे राष्ट्रपतींपेक्षा मोठे आहेत. ते आमच्या बोलावण्यावरूनही इथे येत नाहीत. त्यांना सरळ करावे लागेल, अशा शब्दात गडकरींनी मॉयलच्या सीएमडींना खडेबोल सुनावले आहेत.


कोळसा देताना कोल मंत्रालय सर्वाधिक चिटिंग करते. सोने ( ब्लॅक गोल्ड) काढून ते सोन्याचा पैसा देत नाहीत. ग्रेडनुसार कोळशाला दर मिळायला हवेत. मात्र असे होत नाही, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
इथेनॉलसाठी कमी दर्जाचा कोळसा लागतो आणि कमी दर्जाचा कोळसा विदर्भात आहे, अशी माहिती गडकरींनी खनीज परिषदेत दिली. विदर्भात वनपरिक्षेत्रे अधिक आहेत. आपल्याकडे असलेल्या तेलबियांपासून इथेनॉल तयार करता येईल. वनपरिक्षेत्राचे धोरण आखण्यात आल्यास अविकसित भागात रोजगार उपलब्ध होईल. यावेळी त्यांनी खनीज आणि वन आधारित उद्योगांसाठी सरकारने धोरणे आखण्याची गरजही व्यक्त केली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES