• A
  • A
  • A
नागपुरात विदर्भवाद्यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या, कार्यक्रमाला उशीर झाल्याने लोकांची निराशा

नागपूर - आगामी निवडणुकीच्या तोंडावर विदर्भ वाद्यांतर्फे आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांच्या संबोधनापूर्वीच सुमारे ९० टक्के खुर्च्या रिकाम्या झाल्याचे चित्र बघायला मिळाले. कार्यक्रमाला उशीर झाल्याने अणे यांना ऐकण्यासाठी आलेल्या विदर्भप्रेमी जनतेने त्यांच्या भाषणापूर्वीच कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते.

सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या.


आज विदर्भवादी १२ संघटनांच्यावतीने नागपुरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला एक वाजताची वेळ निर्धारित करण्यात आली होती. मात्र, मुळात कार्यक्रम सुरू व्हायला ३ तास उशीर झाल्याने कार्यक्रम संपण्यापूर्वीच विदर्भवादी जनतेने कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. जाहीर सभेत बोलणार्‍या वक्त्यांची भलीमोठी यादी असल्याने सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांचे भाषण होण्यापूर्वीच कार्यक्रम स्तरावरून निघून जाणे पसंत केले. ज्यावेळी अणे बोलण्यासाठी मंचावर उभे झाले, त्यावेळी सुमारे ९० टक्के खुर्च्या रिकाम्या असल्याचे निराशाजनक चित्र विदर्भवादी नेत्यांना बघावे लागले.
कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांची संख्या अत्यल्प असल्याने श्रीहरी अणे यांनीदेखील आपले भाषण आवरते घेतले. एकीकडे विदर्भवादी नेते विदर्भाच्या जनतेच्या भरवशावर निवडणुकीची रणनीती आखत आहेत. तर दुसरीकडे, अशा प्रकारे विदर्भवादी जनताच कार्यक्रम स्थळी गैरहजर असल्याने कदाचित विदर्भवादी नेत्यांना नव्याने रणनीती आखावी लागेल, असे चित्र आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES