• A
  • A
  • A
विदर्भवादी संघटना आगामी निवडणुका लढवणार, विदर्भ निर्माण महामंचाचा एल्गार

नागपूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विदर्भ निर्माण महामंचाच्यावतीने पहिल्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भवादी संघटनांनी आगामी निवडणुकीत महामंचाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.


हेही वाचा - भाजपविरोधात 'विदर्भ निर्माण महामंच' आक्रमक, विदर्भातील सर्व जागा लढवणार

यावेळी ज्येष्ठ विदर्भवादी श्रीहरी अणे, माजी आमदार वामनराव चटप, समाजसेवक राम नेवले यांच्यासह बारा विदर्भवादी संघटनांचे प्रतिनिधी आणि दिल्ली सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम उपस्थित होते.
या महामंचमध्ये विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, विदर्भ राज्य आंदोलन, आम आदमी पार्टी यासह प्रहार जनशक्ती सारख्या १२ पक्षांचा आणि संघटनांचा समावेश आहे. या सभेदरम्यान भाजप आणि काँग्रेस पक्षावर सडकून टीका करण्यात आली. यावेळी श्रीहरी अणे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर टीका करताना अनेक गोष्टींचा खुलासा केला.

हेही वाचा - तोडगा नाही ! राम शिंदेच्या भेटीनंतरही शेतकरी कन्यांचे अन्नत्याग सुरुच

विदर्भाच्या जनतेचा आवाज बुलंद करण्याकरिता महामंचाची निर्मिती करण्यात आली असून विदर्भाच्या जनतेला हक्काचे सरकार मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे श्रीहरी अणे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. मात्र, आता त्यांना आश्वासनांचा विसर पडला असल्याने विदर्भाची जनता या दोन्ही नेत्यांना पराभूत करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES