• A
  • A
  • A
एल्गार परिषद : सरकारच्या दबावात काम करत आहेत पोलीस - प्रकाश आंबेडकर

नागपूर - एल्गार परिषदेचा तपास करताना पोलीस सरकारच्या दबावात काम करत आहे. याबाबत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने वास्तविकता पहावी. त्याची योग्य तपासणी व्हावी, असे आवाहन भारीपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात केले.


हेही वाचा - 'आरएसएस'संदर्भात आराखडा द्या, अन्यथा आघाडी नाही; प्रकाश आंबेडकरांचा...
प्रकाश आंबेडकर म्हणाले, एल्गार परिषदेनंतर झालेल्या प्रकारासाठी कोण दोषी आहे. याबाबत पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलीसांमध्ये मतभिन्नता आहे. याबाबत सरकार सोयीची भूमिका घेत असून दडपशाही करत आहे.
या प्रकरणात आनंद तेलतुंबडे यांचे कुठेही नाव नाही, आणि त्याबाबत पुरावेही नाहीत. पोलिसांकडे असलेल्या पत्रकात फक्त आनंद, असे नाव आहे, त्यात आडनावाचा कुठेही उल्लेख नाही. त्याच आधारावर आनंद तेलतुंबडे यांना पोलिसांनी अटक केली होती, असे आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा - सन्मानजनक युती झाल्यास वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत - आनंदराज...
मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवते. संघ अदृश्यपणे भाजपला मार्गदर्शन करतो. आघाडीबाबत मी माझ्या भुमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत आणण्याचा आराखडा काँग्रेसकडून जाहीर होत नाही, तोपर्यंत आघाडीची चर्चा पुढे जाणार नाही.
येत्या निवडणुकीत मी निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. पण मतदार संघ अजून निश्चित झालेला नाही, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.
हेही वाचा - आंबेडकर बंधूंच्या विद्यार्थी संघटना मुंबई विद्यापीठाविरोधात आक्रमक

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES