• A
  • A
  • A
नागपूर महिला काँग्रेस कार्यकर्त्यांची 'भाषण- ए- पाठशाला'

नागपूर - लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्षांकडून केली जात आहे. मात्र, निवडणूक प्रचारात भाषण कसे करायचे याचे थेट प्रशिक्षण काँग्रेस तर्फे दिले जात आहे. एरवी उत्तम वक्ते फार कमी पाहायला मिळतात. त्यातच महिला वक्त्यांची कमतरता ही नेहमीच जाणवते आणि हीच कमी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून अखिल भारतीय स्तरावर करण्यात येत आहे.नागपूरात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्तम वक्ता बनविण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात ब्लॉक स्तरावरून तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अशा अनेक काँग्रेस महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी दिल्लीहून प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकदेखील बोलवण्यात आले.


यातून महिला वक्त्यांची फौजच तयार करण्यात येणार आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसनेच या उपक्रमाची आखणी केली आहे. यामध्ये नागपूर विभागातील अनेक महिला कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या शिबिरात भाषणाला उभे कसे राहावे, शब्दांवर जोर कसा द्यावा, तसेच आवाज कुठे वाढवावा इथंपासून कार्यकर्त्यांची तयारी करून घेतली जात आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES