• A
  • A
  • A
सत्तेला सत्य नाहीतर सोय आवडते - सुरेश द्वादशीवार

नागपूर - सत्तेला सत्य कदापी आवडत नाही, तर सोय आवडते, असे मत ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. ते अरविंद बाबू देशमुख पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. त्यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.


लोकशाहीच्या चारही स्तंभाची नासाडी सुरू आहे त्यातून पत्रकारिता देखील सुटलेली नाही. पत्रकारांनो आयुष्यात कधीही मूल्यांशी तडजोड करू नका, ज्या दिवशी तुम्ही तडजोड कराल त्यावेळेला तुमच्या मूल्यांची किंमत लावली जाईल. पत्रकारांनी लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याकरता सातत्याने प्रयत्न करायला हवे. मात्र, हल्लीच्या काळात सत्तेला सत्य कधीही आवडत नाही, तर केवळ सोय आवडते. त्यामुळे अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा मुद्दा सरकारसमोर गौण ठरतो. पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती, तर त्याच्या गळ्याला आवडलेला दूर जितका तितके त्याचे स्वातंत्र्य, असे सांगताना ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आजच्या परिस्थितीवर गंभीर ताशेरे ओढले. पत्रकारांनी स्वतःची विश्वसनीय स्वतः टिकवण्याची गरज असल्याचे देखील ते म्हणाले.
हेही वाचा - आंदोलनकर्त्या मुलींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES