• A
  • A
  • A
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरींचा भाजप सरकारवर घणाघात

नागपूर - प्रसारमाध्यमांची स्वायत्तता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली असल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार विचारवंत आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. शुक्रवारी नागपुरात आयोजित अरविंद बाबू देशमुख स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.


लोकशाहीच्या चारही स्तंभांवर सत्ताधारी आघात करू बघत असल्याचा गंभीर आरोप अरुण शौरी यांनी केला. सरकारच्या बाजूने वृत्तांन्त करत असल्यामुळे माध्यमे विश्वासार्हता गमवून बसल्याचे मत शौरी यांनी व्यक्त केले. सरकार अगदी नियोजनबद्ध पद्धतीने प्रसार माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आज सर्रासपणे पत्रकारांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. त्यामुळे पत्रकारितेची विश्वासाहर्ता घटू लागल्याचे शौरी म्हणाले.
वाचा - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर १३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पत्रकारांनीही सत्ताधाऱ्यांपासून अंतर राखून ठेवायला पाहिजे. जेथे सरकार चुकत असेल त्याठिकाणी सरकारवर आसूड उडायला पत्रकारांनी मागे पाहून नये, असे देखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर कठोर शब्दात टिका केली. आजची प्रसारमाध्यमे स्वतःची जबाबदारी पूर्णपणे विसरले आहेत. माध्यमे स्वतःची जबाबदारी पूर्ण करण्यात असमर्थ दिसत असून त्यामागचे कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांची भीती आणि लालसा असल्याचे ते म्हणाले. आजचा पत्रकार इतका धनवान झाला आहे की तो त्याचे कर्तव्य विसरू लागला आहे. पत्रकार मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करत नाही तर त्याने वॉचडॉगच्या भूमिकेत राहून काम केले पाहिजे, असे अरुण शौरी यांनी सांगितले आहे.

वाचा -VIDEOः वाऱ्याच्या झोताने हलू लागला इमारतीचा खांब, रहिवाशांचा जीव टांगणीला


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES