• A
  • A
  • A
विविध मागण्यांसाठी होमगार्ड कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन; आत्मदहनाचाही इशारा

नागपूर - मागील १२ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी नागपुरच्या संविधान चौकात उपोषणावर बसलेल्या महाराष्ट्र होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केले आहे. सरकारने आमच्या आंदोलनाची योग्य ती दखल न घेतल्याने आम्ही मुंडण आंदोलन केले असल्याचे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापलीकडे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही या आंदोलनकांनी दिला.


हेही वाचा - नागपुरात पाण्याच्या शोधात तोल जाऊन बिबट्या पडला विहिरीत
राज्यातील होमगार्डच्या न्यायिक मागण्यांकरीता २८ जानेवारीपासून होमगार्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आज १२ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही महाराष्ट्र शासनाने किंवा होमगार्ड मुख्यालयाने आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीकोणातून बघितले नाही. यामुळे आंदोलन उग्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - नागपूर विद्यापीठात ABVP कार्यकर्त्यांची तोडफोड, सुरक्षारक्षकाला मारहाण
आंदोलकांनी ४ दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरुन अर्ध जलसमाधी आंदोलन केले होते. सरकारने आमच्यासोबत साधी औपचारिक चर्चा करण्याचे सौजन्य देखील दाखवले नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आणि प्रशासनाविरुद्ध चीड निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - भाजपविरोधात 'विदर्भ निर्माण महामंच' आक्रमक, विदर्भातील सर्व जागा लढवणार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES