• A
  • A
  • A
नागपूर विद्यापीठात ABVP कार्यकर्त्यांची तोडफोड, सुरक्षारक्षकाला मारहाण

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. मागील अनेक दिवसांपासून पुनरपरिक्षेचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे संतापून कार्यकर्त्यांनी हा पवित्रा घेतला. यामध्ये एका सुरक्षा रक्षकालाही बेदम मारहाण करण्यात आली.

कार्यालयात तोडफोड करताना कार्यकर्ते


हेही वाचा - भाजपविरोधात 'विदर्भ निर्माण महामंच' आक्रमक, विदर्भातील सर्व जागा लढवणार
नागपूर विद्यापीठाच्या पुनरपरिक्षांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत. त्यानंतर आज अभाविपच्या विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरामध्ये तणावपूर्ण वातारण तयार झाले आहे.

हेही वाचा - सन्मानजनक युती झाल्यास वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत - आनंदराज आंबेडकर
कार्यकर्त्यांनी तोडफोड करताना कुलगुरू आणि प्रकुलगुरू यांचे कार्यालयातही गोंधळ घातला. तेथील कार्यालयाच्या काचा त्यांनी फोडल्या असून एका सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. सध्या त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

हेही वाचा - बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची दीक्षाभूमीला भेट


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES