• A
  • A
  • A
भाजपविरोधात 'विदर्भ निर्माण महामंच' आक्रमक, विदर्भातील सर्व जागा लढवणार

नागपूर - भाजपने २०१४ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेची ४ वर्ष लोटण्यानंतर आता विदर्भ राज्य आमच्या अजेंड्यावर नाही, असे भाजप सांगत आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विदर्भ निर्माण महामंच विदर्भातील सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती विदर्भ निर्माण महामंचचे समनव्यक राम नेवले यांनी 'ईटीव्ही भारत'ला बोलताना दिली.


हेही वाचा - दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास जनतेची एकाचवेळी सुटका - शरद पवार

सर्व विदर्भवादी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन ''विदर्भ निर्माण महामंच''ची निर्मिती केली आहे. येत्या निवडणुकीत विदर्भ निर्माण महामंच सर्वच विधानसभा मतदारसंघातून तसेच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, विदर्भ माझा पक्ष, शेतकरी संघटना, बी. आर. एस. पी. प्रहार जनशक्ती, जनसुराज्य पक्ष, रिपब्लिकन पक्ष, खोब्रागडे, धोटे विचार मंच, नाग विदर्भ आंदोलन समिती आदी ११ विदर्भवादी संघटना आणि पक्ष यांनी एकत्र येऊन विदर्भ निर्माण महामंच तयार केला आहे. येत्या ९ फेब्रुवारीला नागपुरात पूर्व विदर्भ कार्यकर्ता जनसभा तर १४ फेब्रुवारीला पश्चिम कार्यकर्ता जनसभा, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा - शरद पवारांनी माढ्यातूनच निवडणूक लढवावी, बैठकीत कार्यकर्त्यांचा आग्रहCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES