• A
  • A
  • A
वेतनासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या एल्गार

गोंदिया - मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात १३० प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी वेतनासह विविध मागण्यांसाठी काळी फीती बांधून आंदोलन केले. तसेच त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.


हेही वाचा - श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेसाठी गोंदियातील योग शिक्षिका व ३ विद्यार्थ्यांची निवड
यंदाच्या शैक्षणिक सत्रात मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली नाही. तसेच मागील ८ महिन्यांपासून प्राध्यापकासह कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहेत. अप्रत्यक्षरीत्या महाविद्यालय प्रक्रिया सुरू झालेली आहे. याशिवाय महागाई भत्त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ही बाब संचालकांच्या लक्षात आणून देण्यात आली. मात्र, त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फित्या लावून एल्गार पुकारला आहे. महाविद्यालय परिसरातून शांततेत मुकमोर्चा काढून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गेल्या ३-४ वर्षांपासून संचालक मंडळाने या महाविद्यालयाला बंद करण्याच्या प्रचार सुरू केला आहे. सध्या या महाविद्यालयात १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

हेही वाचा- दोन लाचखोर नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात
दरम्यान दरवर्षी ९ फेब्रुवारीला मनोहर भाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा व्हायचा. या कार्यक्रमाला दिग्गज राजकारण्यांची उपस्थिती असायची. मात्र, मागील ३ वर्षांपासून तो कार्यक्रम दुसरीकडे घेण्यात येत आहे. मात्र, त्यापैकी कोणीच या प्राध्यापकांच्या समस्यांची दखल घेतली नाही. तसेच महाविद्यालयातील व्यवस्थापकांनीदेखील प्राध्यापक कर्मचाऱ्यांची साधी विचारपूस केली नाही. त्यामुळे बदला घेण्याच्या उद्देशाने वागत असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES