• A
  • A
  • A
श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेसाठी गोंदियातील योग शिक्षिका व ३ विद्यार्थ्यांची निवड

गोंदिया - आगामी आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील योग शिक्षिका माधुरी परमार व इतर ३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आगामी ११ फेब्रुवारीपासून श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विवेक मंदिर शाळेतील हे विद्यार्थी असून त्यांच्यासह योगशिक्षिका माधुरी परमार यांचीही निवड या स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे.


या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेसाठी विवेक मंदिर येथील इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी ओजस्वी परमार, इयत्ता ६ वीचा भागर्व मेश्राम आणि केजी २ चा अथर्व परमार या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. रोहन महाराष्ट्र योगा परिषद महाराष्ट्र व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांच्यावतीने यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा - निर्भया बेटी सुरक्षा अभियाना अंतर्गत शाळेतील मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण
योग शिक्षिका माधुरी परमार या योग विज्ञानात पदवीधर असून गोंदिया जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत यांना जिल्हास्तरीय युवक स्पर्धेत ९ वेळा राज्यस्तरी योग स्पर्धेत यश मिळाले आहे. ६ वेळा आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत यश मिळाले असून ६ वेळा सन्मानित करण्यात आले आहेत.
हेही वाचा - गोंदियात भरली बिऱ्हाड परिषद, राज्यातील भटक्या विमुक्तांची उपस्थिती

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES