• A
  • A
  • A
दोन लाचखोर नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया - मुरूमाचा टिप्पर सोडवण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या २ नायब तहसीलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) गुरुवारी लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी तहसील कार्यालयात करण्यात आली. राजश्री मलेवार (४४) आणि तिलकचंद टिकाराम बिसेन (५५) अशी लाचखोर नायब तहसीलदारांची नावे आहेत.


हेही वाचा - बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना ५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
काही दिवसापूर्वी पारडीबांध येथील एका व्यक्तीचे मुरूम वाहतूक करणारे वाहन नायब तहसीलदार राजश्री मलेवार यांनी पकडला होता. या प्रकरणात आरोपी नायब तहसीलदारने आणि तिलकचंद बिसेन यांनी टिप्पर मालकाकडे २७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. मात्र, तडजोडी अंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला ही रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यानंतर गुरुवारी एसीबीने सापळा रचून या २ नायब तहसीलदारांना १५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

हेही वाचा - साताऱ्यात ५०० रुपयांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
दोन्ही आरोपींना अटक करून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपींविरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात कलम ७ (ब), ७ अ लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES