• A
  • A
  • A
'आरएसएस'संदर्भात आराखडा द्या, अन्यथा आघाडी नाही; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला इशारा

गोंदिया - भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची मागणी कली आहे. आर. एस. एस.ला संविधानाच्या चौकटीत घेण्यासंदर्भात आराखडा देत नाही, तोपर्यंत आम्ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असा पुनरुच्चार आंबेडकरांनी गोंदियातील सभेत केला आहे.


हेही वाचा - भाजपसोबत शिवसेनेचे सूत जुळले, युतीसाठी सेनेचीही तयारी?

गोंदिया शहरात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित जाहीर सभेला मोठी गर्दी जमली होती. भीमनगर मैदानात आयोजित सभेत आंबेडकर यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केला. देशात पुन्हा मोदींची सत्ता आली, तर फॅसिस्ट शक्तीबरोबरच धार्मिक हुकूमशाही येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. प्रतिष्ठा, मान-सन्मान मिळविण्याकरिता व्यवस्थेला आपल्या ताब्यात घेणे गरजेचे आहे. आर. एस. एस. आणि भाजप हे धार्मिक हुकूमशाहीचे प्रतिक असून आतापर्यंत बघितलेले हुकूमशहा हिटलर, मुसोलिनी हे सैनिक होते. त्यांचे विचार त्यांच्या जिवंत असे पर्यंतच राहायचे, मात्र, भाजपची हुकुमशाही विचारांची असून लादली जात असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - श्रीमंताला श्रीमंत अन् गरिबांना गरिब करणे हेच सरकारचे धोरण - प्रकाश आंबेडकर

सरकार या पूर्वीही बदलत होते, मात्र, आपले अधिकार तसेच राहत होते. पण हे सरकार परत आले तर तुम्हाला कैदी केल्याशिवाय राहणार नाही. नोकऱ्या संपविल्या जात आहेत, तुम्हाला कामगार करून ठेवण्याचे भाजपचे धोरण आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा - 'राजीव कुमार हाजिर हो!' सीबीआय न्यायालयासमोर चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश

काँग्रेससोबत युतीसाठी ३० जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, अद्याप यावर काँग्रेसकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. आगामी लोकसभा निवडणूक पाहता आता वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे मोठ्या प्रमाणावर सभा घेण्यात येणार असल्याचे भारिपकडून सांगण्यात आले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES