• A
  • A
  • A
निर्भया बेटी सुरक्षा अभियाना अंतर्गत शाळेतील मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण

गोंदिया - येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आज शाळेतील 2 हजार मुलींना निर्भया बेटी सुरक्षा अभियाना अंतर्गत आत्मसुरक्षा (सेल्फ डिफेन्स)चे प्रशिक्षण व डेमो देण्यात आले. यावेळी गोंदियातील जिल्हा अधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी उपस्थिती दर्शवली. या प्रशिक्षणाला मागील १० दिवसांपासून गोंदिया शहरातील प्रत्येक शाळेत सुरुवात झाली असून आज या प्रशिक्षणाचा शेवट आहे.



हेही वाचा - अतिदुर्गम नक्षल भागात गोंदिया पोलिसांतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

यावेळी २ हजार मुलींनी उपस्थिती लावली. गोंदिया शहरातील गेम स्पोर्टस करिअर डेव्हलपमेंट फाऊंडेशनद्वारे प्रत्येक शाळेतील मुलींना निर्भय सुरक्षा अभियान अंतर्गत सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण मागील १० दिवसांपासून मोफत दिले जात आहे. या प्रशिक्षणामध्ये मुलींने आपले स्वतःचे संरक्षण कशा प्रकारे करावे यासाठी अनेक प्रकारच्या ट्रेंनिग देण्यात आल्या.


यात मार्शल आर्ट, बेसिक ट्रेनिंग आणि कराटे ट्रेनिंग असे अनेक प्रकार या दहा दिवसात फाऊंडेशनच्या माध्यमातून शिकवण्यात आले. तसेच या प्रशिक्षणामध्ये मुलींनी ज्या ट्रेनिंग घेतल्या त्या ट्रेनिंगचे डेमो जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडेंसमोर करून दाखवण्यात आले.


हेही वाचा - भटक्या समाजाच्या वसाहतीतदेखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावा; बिऱ्हाड परिषदेत ठराव





CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES