• A
  • A
  • A
अतिदुर्गम नक्षल भागात गोंदिया पोलिसांतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

गोंदिया - प्रथमच गोंदिया पोलीस विभागातर्फे जिल्ह्यातील म्हैसुली या अतिदुर्गम नक्षल भागात राहणाऱ्या आदीवासी व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या गावातील महिलांना साडी व पुरुषांना धोतरचे वाटप तसेच गावजेवण देण्यात आले.


हेही वाचा - भटक्या समाजाच्या वसाहतीतदेखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावा; बिऱ्हाड परिषदेत ठराव
जिल्ह्यातील देवरी तालुक्यातीळ चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम नक्षल भागातील म्हैसुली गावात गोंदिया पोलीस विभागातर्फे पहिल्यांदाच गावातील आदिवासी तसेच इतर गावातील लोकांसाठी आरोग्य तपासणीचे कार्यक्रम पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. या शिबिरात म्हैसूली गावातील लोकांनी याचा लाभ घेतला. या शिबिराला गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरीश बैजल व त्याच्या पत्नीही उपस्थित होते. झाल्याने गावातील नागरिक व आदीवासी लोकांनी आदीवासी नृत्य करून त्याचे स्वागत केले. या आरोग्य शिबीरात बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आदी रोगांचे तज्ज्ञ उपस्थित होते. या गावातील लोकांचे आरोग्य तपासणी केली आहे. तसेच महिला डॉक्टरही शिबिराला उपस्थित असल्याने गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
या शिबिरामध्ये गावातील साडेतीनशे महिलासाठी तर ५० वयोवृद्ध पुरुषांसाठी धोतर व कपड्याचे वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिरासाठी नागपूर व गोंदिया महाविद्यालयाच्या डॉक्टरांची टीम उपस्थित होती. तसेच म्हैसूली गावातील लोकांबरोबर परिसरातील लोकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.

हेही वाचा - गोंदियातील नगरसेवकाने कापला वाळू घाटाचा केक, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा वाढदिवस


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES