गोंदिया - अनेक दिवसांपासून गोंदियातील वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक पंकज यादव यांनी वाढदिवशी वाळू घाटाच्या प्रतिकृतीचा केक कापला.
हा केक कापून आपण शासनाचा निषेध केल्याचे यादव यांनी सांगितले. वाळू घाटांचा लिलाव अनेक दिवसांपासून झाला नाही. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याकडे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे पंकज यादव म्हणाले.
पंकज यादव हे वाळू घाट लिलाव धारक असून त्यांचा वाळूचा व्यवसाय आहे. त्यांनी रविवारी आपला ४९ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी वाळू घाटाची प्रतिकृती असणारा केक कापला. यात वाळू चोरी करण्यासाठी लागणारे साहित्यदेखील दाखविण्यात आले होते.