• A
  • A
  • A
गोंदियात भरले पशू प्रदर्शन, २१ आणि ३० लिटर दूध देणाऱ्या गायी ठरल्या आकर्षण

गोंदिया - शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालनाकडे पाहतात. मात्र कुठल्या प्रजातीचे पशुपालन करावे व कशा पद्धतीने त्याचे संगोपन करावे हे त्यांना माहित नसते. यासाठी गोंदिया तालुक्याच्या डोंगरगाव इथे पशू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात २१ लिटर दूध देणारी आणि ३० लिटर दूध देणारी गाय प्रमुख आकर्षण ठरल्या. उत्कृष्ट पशुपालन करणाऱ्या पशुपालकांना आमदार विजय रांगडले आणि पशुसंवर्धन सभापती शैजल सोनवणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गोंदिया तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपल्या काळ्यापांढर्‍या पशुधनाला एकत्र आणत एका आगळ्यावेगळ्या पशू प्रदर्शनाचे आयोजन केले. गोंदिया जिल्हा परिषद येथील कृषी व पशुसंवर्धन सभापती शैजला सोनवणे आणि आमदार विजय रांगडले यांच्या हस्ते गोपूजन करुन प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा - संत विचारांच्या मेजवाणीने मुलीचा वाढदिवस साजरा

यामध्ये देशी गायीचे संवर्धन करणारे शेतकरी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले. शैवाल, गीर, कॉकरेल, थारपरकर, गावलाड, खिलार, रेडशिंदी, जर्शी, हॉस्टर्न, फ्रिजन या प्रजातीच्या गायी, तर शेळ्यांमध्ये उस्मानाबादी बारबेरी, आणि सिहोर या जातीच्या शेळ्या प्रदर्शनात दिसून आल्या. तर देशी कोंबड्या, कबुदर कोंबड्या हेही या प्रदर्शनाचे आकर्षण होते. तसेच, शेतकऱ्यांचा खरा मित्र समजला जाणारा सर्जा राजा बैल आणि इतर प्रजातीचे पशुधन या प्रदर्शनात ठेवण्यात आले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES