• A
  • A
  • A
बसेस नसल्याने शाळकरी विद्यार्थी त्रस्त; पालकही चिंताग्रस्त

गोंदिया - स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढावे आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासनाने 'गाव तिथे शाळा' ही योजना सुरू केली आहे. मात्र, ज्या गावात शाळा नाहीत त्या ठिकाणी शासनाने मानव विकास बस सेवा सुरू केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शिक्षण घेत असलेल्या मुला- मुलींना या बस सेवेचा लाभ जसा मिळायला हवा तसा मिळत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.


हेही वाचा - शेतकऱ्याचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
गोंदिया जिल्ह्यातील देवरी हा नक्षलग्रस्थ भाग आहे. गोंदिया ते देवरी या रस्त्यावरून अनेक गावातील शेकडो विद्यार्थी दररोज प्रवास करतात. शाळा, महाविद्यालये आणि आयटीआयमधील विद्यार्थी देवरी येथे शिक्षणासाठी जातात. शाळा, महाविद्यालय आणि आयटीआयचे विद्यार्थी तासिका संपल्यानंतर घरी येण्यासाठी बसस्टॅापवर येतात. परंतु, त्यांना अनेकदा बससाठी तासन् तास वाट पाहावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहचायला उशीर होतो. या काळात काही अप्रीय घटना घडल्या तर, जबाबदार कोण? असा प्रश्न पालक आणि ग्रामस्थांनी विचारत आहेत.
हेही वाचा - गोंदियात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान
यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांनी वेळेवर घरी पोहचावे यासाठी शासनाने या रस्त्यावर मानव विकास बसची सेवा नियमित सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES