• A
  • A
  • A
शेतकऱ्याचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

गोंदिया - जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या भडगाव येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी आपल्या मागण्यांसाठी चार दिवसांपासून गोरेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र, चार दिवस उलटूनही शासनाने या शेतकऱ्याची कोणतीही दखल घेतलेली नाही.


सन २०१२-१३ मध्ये न्याय देण्यास प्रशासनाने विलंब केल्यामुळे ते जमिनीची चुरणी करू शकले नाही. राजस्व विभागाच्या चुकीमुळे रेकॉर्ड दुरुस्तीला पाच वर्षे लागली. सतत पाच वर्ष शेती पडीक राहिल्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई देण्यात यावी, रेकॉर्ड दुरुस्तीला चार वर्ष विलंब लावणाऱ्या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी यासह पाच वर्ष धावपळ व मानसिक त्रासासाठी आलेला खर्च देण्यात यावा या मागण्यांना घेऊन कोमलप्रसाद कटरे यांनी तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा - गोंदियात शार्टसर्किटने दुकानाला आग, लाखो रुपयांचे नुकसान
आमरण उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटरे प्रयत्न करीत आहेत. त्यांनी प्रथम शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याच्या मागणीला घेऊन उपोषण केले होते. शेवटी हतबल झालेल्या प्रशासनाने कोमलप्रसाद यांना न्याय देत रस्ता तयार करून दिला. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने चार ते पाच वर्षे लावले त्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त झाल्याचा आरोपही कटरे यांनी केला आहे.
हेही वाचा - गोंदियात रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES