• A
  • A
  • A
गोंदियात शार्टसर्किटने दुकानाला आग, लाखो रुपयांचे नुकसान

गोंदिया - शहरातील किराणा दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अमित वाध्वानी यांच्या मालकीच्या दुकानात शार्टसर्किटमुळे ही आग लागली.


आज सायंकाळच्या सुमारास ही आग लागली असून या आगीत दुकानातील बिस्किट पॅकेट, कुरकुरे पॅकेट, सिगारेट व बिडी, साबण, इत्यादी अनेक साहित्य जळून खाक झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार आगीत ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुकान मालक दुकान बंद करुन घरी गेले होते.

हेही वाचा - पुण्यात भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून तरुणाचा निघृण खून
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग नियंत्रणात आणली. या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES