• A
  • A
  • A
गोंदियात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान

गोंदिया - भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६९ वा वर्धापन दिन गोंदियात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोंदिया येथील कारंजा पोलीस मुख्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांकडून पोलीस पथसंचलनाची सलामी स्वीकारण्यात आली.


जिल्ह्यातील नक्षलवाद्यांशी लढा देताना हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस जवानांना पोलीस महासंचालकांनी पराक्रम पदक २७ नोव्हेंबर २०१८ ला जाहीर केले होते. अशा ११ हुतात्मांच्या कुटुंबीयांना आज प्रजासत्ताक दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोलेंच्या हस्ते पदक तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले.
हेही वाचा - नव्या महाराष्ट्र निर्माणासाठी एकत्रित येऊ - राज्यपाल
जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी गौरव करण्यात आला. तसेच त्यांना सन्मान म्हणून प्रमाणपत्राचे वाटपही या वेळी करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या भाषणातून शासनाच्या विविध उपक्रमांची माहितीही या वेळी उपस्थितांना दिली.
हेही वाचा - गोंदियात लवकरच सुरू होणार विमानसेवा - राजकुमार बडोले

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES