• A
  • A
  • A
व्हिडिओ : गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने वाचले प्रवाशाचे प्राण

गोंदिया - रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने धावत्या रेल्वेगाडीतून खाली पडत असलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविल्याची घटना गुरूवारी घडली. ही घटना रेल्वे स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.


हेही वाचा - गोंदियात लवकरच सुरू होणार विमानसेवा - राजकुमार बडोले
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, मुबंई ते हावडा शालीमार एक्सप्रेस ४ वाजताच्या सुमारास गोंदिया स्थानकावर पोहोचली. यावेळी एक प्रवासी धावत्या रेल्वे गाडीतून खाली उतरत असताना रेल्वेखाली पडला. मात्र, त्या प्रवाशाला आपले गंतव्य आले असल्याचे कळलेच नाही. दरम्यान, ही बाब रेल्वे स्थानावर कर्तव्य बजावत असणारे पोलीस शिपाई एकनाथ बाणबले यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या व्यक्तीला हात देत वर ओढत त्याचे प्राण वाचविले. त्यानंतर त्या व्यक्तीला प्राथमिक उपचाराकरिता रेल्वे रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या इतर लोकांनीही त्याला मदत करीत धीर दिला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
हेही वाचा - गोंदिया : ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात, दोघांचा मृत्यू
थोडक्यात आपले प्राण वाचले याची जाणीव त्या प्रवाशाला होताच तो फार घाबरलेला होता. मात्र, त्याला पाणी पाजून शांत करण्यात आले. नंतर प्रवाशांनी आपल्या घरचा रस्ता धरला. मात्र, सुरक्षारक्षक बाणबले यांनी तत्परता दाखविली नसती तर ही घटना त्या प्रवाशाच्या जीवावर बेतली असती. बाणबले यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES