• A
  • A
  • A
पेंढरी तालुका निर्मितीसाठी गावकऱ्यांचा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

गडचिरोली - जिल्ह्यातील अतिदुर्गम तसेच विकासापासून कोसो दूर असलेल्या पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात येण्याच्या मागणीसाठी जवळपास ५०-६० गावातील गावकऱ्यांनी मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव सावंगा येथे झालेल्या सभेत घेण्यात आला. या सभेला सर्व गावातील सरपंच, ग्रामसभेचे अध्यक्ष, भूमिया तसेच हजारोंच्या संख्येने गावकरी उपस्थित होते.


पेंढरी व आजूबाजूच्या परिसरातील गावे धानोरा तालुका मुख्यालयापासून ७० किमीपेक्षा अधिक लांब असल्याने शासकीय कामाकरिता आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दळणवळणाकरिता वाहनांची सोय नाही. जिल्हा मुख्यालयापासून एसटीच्या केवळ २ फेऱ्या होतात. रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत येथील नागरिक राहत आहेत. त्यामुळे पेंढरीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा यासह १६० विविध मागण्यांचे निवेदन पेंढरी तालुका कृती समितीने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना सादर केले आहे. हेही वाचा - २०१९ ची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी - मुख्यमंत्री
येत्या २० फेब्रुवारीपासून गावकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात चक्काजाम, बाजापेठ व शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार आहे. हे आंदोलन ४ दिवस असेच सुरू राहील. त्यानंतर २४ फेब्रुवारीला गडचिरोली जिल्हाकार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर मोर्चेकरी साखळी उपोषणास बसतील. प्रशासनाने यानंतरही प्रतिसाद न दिल्यास १ मार्च पासून आंदोलनाचे स्वरूप तीव्र करण्यात येणार आहे. त्यानंतर जेलभरो आंदोलन करून निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार टाकण्यात येणार आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी सावंगा बुजरूक येथे गावकऱ्यांची सभा पार पाडली. या सभेत पेंढरी तालुका निर्मितीचा संकल्प सोडण्यात आला. यावेळी संयुक्त गाव गणराज्य ग्रामसभा परिषद तथा तालुका निर्माण कृती समिती, सावंगाचे सरपंच बाबुराव गेडाम, कामनगडचे सरपंच वसंत तुलावी आदी उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES