• A
  • A
  • A
माओवादी नेता प्रा. वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंगची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी

गडचिरोली - नक्षल्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून प्रा. वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग या दोघांना पुणे पोलिसांकडून गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना अहेरी न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी ही कोठडी संपताच दोघांनाही पुन्हा अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांनाही पुणे पोलिसांकडे सोपविल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


चौकशीसाठी या दोघांना गडचिरोली पोलिसांना कधीही ताब्यात घेता येणार आहे. प्रा. वरवरा राव व नागपूरचे वकील सुरेंद्र गडलींग यांना गतवर्षी पुणे पोलिसांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते दोघेही पुणे पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांच्यावर डिसेंबर २०१६ साली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खनिज पहाडावर झालेल्या नक्षल जाळपोळीत सहभाग असल्याचा आरोप होता. त्यामुळे ३१ जानेवारीला दोघांनाही गडचिरोली पोलिसांनी पुणे पोलिसांकडून ताबा घेतला होता. दोघांनाही अहेरी न्यायालयात हजर केल्यावर त्यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.
वाचा-नागेश्वर राव दोषी, एक लाखाच्या दंडासह दिवसभर न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा
या दोघांवर २३ डिसेंबर २०१६ रोजी एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खनिज टेकड्यांवर ८० मालवाहतूक ट्रक जाळल्याप्रकरणी सहभागी असल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुणे पोलिसांच्या तपासात गडलिंग यांच्या घरी धाड टाकली असता या धाडीतून मिळालेल्या संगणक हार्ड डिस्कमधून वरिष्ठ नक्षल नेत्यांशी असलेल्या पत्रांचा खुलासा झाला होता. यात जाळपोळ झालेल्या भागात संपर्क वाढ, पैशाचा पुरवठा, मेळावे-बैठक घेत कॅडर मध्ये चैतन्य निर्माण करणे आदींचा उल्लेख होता. या दोघांनी जाळपोळीसाठी वातावरण निर्मिती आणि पोलीस पथक तैनाती, सुटकेचे मार्ग याबाबत गडचिरोली आणि छत्तीसगड सीमावर्ती भागात रेकी केल्याचे सूत्रांचे मत आहे.




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES