• A
  • A
  • A
मजुरांच्या आंदोलनाचा तिढा सुटला, सुरजागड पहाडावरील उत्खननाचे काम सुरू होणार

गडचिरोली - गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने बसला धडक दिली होती. या अपघातात ४ जण ठार झाल्यामुळे सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या उत्खननाचे काम बंद करण्यात आले होते. हे काम पूर्ववत सुरू करण्यासाठी १५० ते २०० मजुरांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. उत्खनन सुरू करण्याच्या आश्वासनानंतर मजुरांनी साखळी उपोषण थांबविले.


हेही वाचा - स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या लिपीकाचे पदाला मान्यता न दिल्यामुळे...
लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीद्वारे सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरू होते. मात्र, १६ जानेवारीला लोहखनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने बसला धडक दिली. या अपघातानंतर अचानक लोहखनिज उत्खननाचे काम बंद करण्यात आले. यामुळे शेकडो मजुरांच्या हातचे काम हिरावले गेले. त्यानंतर काम सुरू करण्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना मजुरांनी एक पत्र दिले. काम सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याने अनेक मजुरांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण केले.

गुरुवारी आमदार डॉ. देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी लवकरात लवकर लोहखनिज उत्खनन सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी उपोषणाची सांगता केली.


हेही वाचा - फायलींना पाय फुटायचे होणार बंद! विधी खात्यावर सिसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु करण्यास लॉयड मेटल्स कंपनी आणि प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. या कामातून स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याचे कंपनीचे धोरण आहे. सोबतच कोनसरी येथील प्रकल्पही सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनातर्फे कार्यस्थळी पुरेशी सुरक्षा मिळाल्यास महिन्यातून २५ दिवस उत्खननाचे कार्य सुरू ठेवता येईल आणि त्यामुळे मजुरांना २५ दिवस रोजगार मिळेल, असे लॉयड मेटल्स कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांनी सांगितले.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES