• A
  • A
  • A
सीआरपीएफ १९२ बटालियनकडून गडचिरोलीत ग्रामस्थांना साहित्याचे वितरण

गडचिरोली - सिव्हिक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत येथील सीआरपीएफ बटालियन १९२ कडून गुरुवारी ग्रामीण भागामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना स्मृती चषक देऊन गौरविण्यात आले तसेच ग्रामीण नागरिकांना विविध साहित्यांचे वाटप सीआरपीएफचे (आयजी) पोलीस महानिरीक्षक राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. सीआरपीएफ बटालियन १९२ च्या गडचिरोली येथील मुख्य कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी सीआरपीएफ तर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना स्मृती चषक व क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर धानोरा तालुक्यातील ७ गावातील नागरिकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये ब्लँकेट, स्ट्रीट लाईट, मोठी भांडी अशा वस्तूंचा समावेश होता. सीआरपीएफ तर्फे सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयजी राजकुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षणात धानोरा तालुक्यातील ३० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
वाचा-चुकीच्या धोरणांमुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित - पृथ्वीराज चव्हाण
या कार्यक्रमाला सीआरपीएफचे डीआयजी संजय के. आर, कमांडंट जीहाऊ सिंग, कमांडंट शिवशंकरा, सेकंड कमांडंट दीपक साहू, कुलदीप सिंग, डेप्युटी कमांडंट प्रमोद शिरसाट, ए. के. अनास, संध्याराणी, वेदपाल सिंग, सपन सुमन, मनीष महाले, कैलास गंगावणे आदी उपस्थित होते.

वाचा- ...अन् निवडणुकीला ऊभे राहण्याअगोदरच आमदार महोदय 'पडले'; व्हिडिओ व्हायरल


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES