• A
  • A
  • A
गडचिरोलीत हत्या सत्र सुरुच; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन ग्रामसभा अध्यक्षाची हत्या

गडचिरोली - जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्या सत्र सुरुच आहे. बुधवारी रात्री नक्षलवाद्यांनी आणखी एकाची हत्या केल्याची घटना भामरागड तालुक्यातील विसामुंडी येथे घडली. आनंद मडावी असे हत्या मृताचे नाव असल्याचे समजते. मृत पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आली. गेल्या १७ दिवसातील ही आठवी हत्या आहे.



हेही वाचा - सुरजागड लोह प्रकल्प सुरू करण्याची मागणी; मजुरांचे साखळी उपोषण सुरू
यापूर्वी २२ जानेवारीला भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील ३ नागरिकांची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यांचे मृतदेह भामरागड-आल्लापल्ली मार्गावर फेकून दिले होते. तर दुसऱ्याच दिवशी अनेक ठिकाणी नक्षली बॅनर आढळून आले. यामध्ये नक्षलवाद्यांनी भारत बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या ताळगुडा येथील सोनसाय बेग याची हत्या केली होती.

हेही वाचा - पोलीस दलातर्फे आयोजित विवाह सोहळ्यात ५४ आदिवासी जोडपी होणार विवाहबद्ध
त्यानंतर कोरची तालुक्यातील बेळगाव येथे भाजीपाल्याचा ट्रक पेटवून दिला. तर त्याच रात्री गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव जवळील मजगाव येथेही रस्ता कामावरही २ जेसीबी व ४ ट्रॅक्टर नक्षल्यांनी पेटवून दिले होते. या सर्व घटना ताज्या असतानाच २ फेब्रुवारीला पुन्हा नक्षल्यांनी धानोरा तालुक्यातील मार्केगाव येथील दोघांची हत्या केली. त्यानंतर आज पुन्हा एकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत हा ग्रामसभेचा अध्यक्ष होता. ८ वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचीही नक्षल्यांनी हत्या केली होती.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES