• A
  • A
  • A
'या' गावाला मिळणार 'करोडपती गाव' अशी नवी ओळख..!

गडचिरोली - वन परिक्षेत्र घोट अंतर्गत येणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील गरंजी गावाला अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी हक्क मान्य करण्यात आले. या सामूहिक वनहक्काचे वाटप बुधवारी गंरजी येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण देशातील सर्वात मोठा वनहक्क मंजूर झाल्याने उद्यापासून 'करोडपती गरंजी गाव' अशी नवी ओळख मिळणार आहे.


कार्यक्रमाचे उद्घाटन मुलचेराचे तहसिलदार अनिरुद्द कांबळे यांनी केले. अध्यक्षस्थानी गंरजी गोटूल समितीचे अध्यक्ष सन्याशी हीचामी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसिलदार समशेर पठाण, घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर तनपूरे, श्रेत्रसहाय्यक आर.डी. घोरुडे, तलाठी, पी.बी मेश्राम, रमेश नरोटे, फकीरा दूर्वा, कोतू नरोटे, विनय हिचामी, राजू नरोटे, लालाजी हिचामी, किशोर हिचामी, वासुदेव मडावी, रामदास पुगांटी, बाजीराव हिचामी आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - गडचिरोलीत ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन
याप्रसंगी आदीवासी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने ढोलताशाने आदिवासी नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी मुलचेराऱ्याचे तहसिलदार अनिरुद्ध काबंळे व मान्यवरांच्या हस्ते गंरजी गावकऱ्यांच्या उपस्थित सामूहिक वनपट्टा सुपूर्द करण्यात आला.
तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गरंजी गावाला मुख्याध्यापक विजय कारखेले यांच्या प्रयत्नाने व संघर्षाने महाराष्ट्रातीलच नव्हे सर्पूर्ण देशातील सर्वात मोठा वनहक्क मंजूर झाल्याने उद्यापासून 'करोडपती गरंजी गाव' अशी नवी ओळख मिळणार आहे. मुलचेराचे तत्कालीन तहसिलदार श्रीकांत पाटील व के. डी. मेश्राम यांच्या सहकार्याने गरंजीचे मुख्याध्यापक विजय कारखेले यांनी २००८ पासून सामूहिक वनहक्काबाबत जनजागृती केली. घरोघरी जाऊन वनहक्क लढ्यासाठी प्रवृत्त केले. सामूहिक वनहक्क लढ्यासाठी २०१६ साली प्रयत्न करताना गरंजी ग्रामस्थांवर वनविभागाकङून पोलिसांमार्फत गुन्हे दाखल केले. यावेळी मुख्याध्यापक कारखेले यांनी रेगडी पोलीस ठाण्यात जाऊन कमीत-कमी लोकांवर गुन्हे दाखल करण्याची व अटकेनंतर जामीन प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याची विनंती पोलीस प्रशासनास केली. त्यानुसार गरंजीतील कमीत कमी लोकांवर गुन्हे दाखल झाले व चामोर्शी न्यायालयातून जामीन प्रक्रिया पार पडली.
हेही वाचा - आल्लापल्लीत ५४ आदिवासी जोडपी विवाहबद्ध; आत्मसमर्पण केलेल्या नक्षल जोडप्यांचाही समावेश
त्यानंतर कारखेले यांनी लोकवर्गणी करुन चामोर्शी न्यायालयात केस स्टँड केली. गेल्या २०१५ सालापासून गङचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जे मंत्रीमहोदय आले किंवा सचिव, मंत्रालयीन समित्या आल्या. मुख्याध्यापक कारखेले यांनी गरंजी गावातील शिष्टमंडळाला घेउन मंत्रीमहोदयांकडे निवेदन देऊन भेट घेतली व गरंजीवासियांची बाजू प्रभावीपणे मांङली.
गरंजी गावाने मागणी केलेले बांबूचे सर्वच १० कंपार्टमेंट जवळपास १ हजार ७५० हेक्टर जगंलक्षेत्र गरंजी गावाला मंजूर झाले आहेत व पेसा कायद्यान्वये बांबू तोड व विक्री हा संपूर्ण अधिकार गरंजी ग्रामस्थांना मिळाला आहे. यामुळे एवढे मोठे क्षेत्र मिळणारा गंरजी गाव देशातील इतिहासातील एकमेव गाव ठरला आहे. एका कंपार्टमेंटमध्ये बांबू तोडीतून कमीत कमी ४० ते ४५ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे आता दरवर्षी कमीत कमी ३ कंपार्टमेंट बांबू तोडून गरंजी गाव करोडपती गाव म्हणून नावारुपास येणार आहे. प्रत्येक वर्षी किमान ३ कंपार्टमेंटमधील बांबू तोडल्यास गरंजी पहिले ३ वर्षे करोपती बनेल. त्यानंतर अनुक्रमे बांबूतोड सुरुच राहील व दरवर्षी गाव करोडपती असेल. सामूहिक वनहक्काचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज गरंजीसह पंचक्रोशीतील आदिवासी बांधव गरंजीत येऊन आपली आदिवासी नृत्यकला सादर करून गावात आज नेत्रदीपक सोहळा अनुभवयास मिळाला.
हेही वाचा - सुरजागड लोह प्रकल्प सुरू करण्याची मागणी; मजुरांचे साखळी उपोषण सुरू

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES