• A
  • A
  • A
सुरजागड लोह प्रकल्प सुरू करण्याची मागणी; मजुरांचे साखळी उपोषण सुरू

गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील अपघाताच्या घटनेनंतर सुरजागड लोह प्रकल्पाचे काम मागील १६ जानेवारीपासून बंद पडले आहे. या घटनेनंतर कंपनीने काम बंद ठेवले आहे. त्यामुळे येथे काम करणार्‍या शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याने कंपनीने त्वरित उत्खननाचे काम सुरू करावे, या मागणीसाठी जवळपास १५० ते २०० मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.


एटापल्ली येथून जवळच असलेल्या गुरुपल्ली येथे १६ जानेवारी २०१९ ला ट्रक आणि बसच्या अपघातात ४ जण ठार झाले होते. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी लोह खनिजाची वाहतूक करणारे १५ ट्रक पेटवून दिले होते. त्यामुळे उत्खनन करणाऱ्या लायड मेटल कंपनीने काम बंद ठेवले आहे. या घटनेला आज २० दिवस लोटले. मात्र, अद्यापही काम सुरू न झाल्याने येथे काम करणाऱ्या ८०० ते ९०० मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हेही वाचा- शताब्दी साजरी केलेल्या शाळेला कुलूप ठोकून पालकांचे 'शाळा बंद' आंदोलन
मजुरांना कोणतीही माहिती न देता कंपनीने काम बंद केल्याने कामावर असणाऱ्या १५० ते २०० मजुरांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाने कंपनीला काम सुरू करण्याचे आदेश द्यावे, कंपनीने मजुरांना २५ दिवस कामभत्ता द्यावा, कोनसरी येथे होत असलेल्या प्रकल्पात अहेरी उपविभागातील नागरिकांना प्राधान्य द्यावे व या प्रकल्पाचे लवकर काम सुरू करावे, सुरजागड पहाडीवर काम करणाऱ्या मजुरांना कंपनीकडून विम्याचे संरक्षण द्यावे, अशा मागण्या मजुरांनी केल्या आहेत. जोपर्यंत काम सुरू करणार नाही, तोपर्यंत साखळी उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे.
हेही वाचा-गडचिरोलीत ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES