• A
  • A
  • A
शताब्दी साजरी केलेल्या शाळेला कुलूप ठोकून पालकांचे 'शाळा बंद' आंदोलन

गडचिरोली - ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या चामोर्शी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी कुलूप ठोकले आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने भौतिक सुविधा पुरवल्या नाहीत. त्यामुळे संताप व्यक्त करत पालकांनी 'शाळा बंद' आंदोलन सुरू केले आहे. या शाळेने २०१७ मध्ये शताब्दी महोत्सव साजरा केला होता. मात्र, या ब्रिटिश कालीन शाळेची सध्या दयनीय अवस्था झाली आहे.


हेही वाचा-गडचिरोलीत ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन
तालुका मुख्यालयातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज लक्षात घेता १९१५ मध्ये चामोर्शी येथे जिल्हा परिषद केंद्र शाळेची स्थापना झाली. या शाळेतून अनेक गुणवंत विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले आहेत. या शाळेत सध्या २८५ विद्यार्थी शिक्षण घेत असून ९ तुकड्यांमध्ये वर्ग भरवले जातात. शाळेत १५ वर्गखोल्या असून ६ वर्गखोल्यांमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल भरवले जाते. मात्र, शाळा इमारत ब्रिटिशकालीन असल्याने इमारतीला तडे गेले आहेत.
या इमारतीचे निर्लेखन किंवा नव्या इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी पालकांनी अनेकदा केली. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, खासदार, आमदार यांना निवेदने दिली. मात्र, त्यानंतरही शाळेकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांच्या जीवाचा धोका लक्षात घेत मंगळवारी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद आंदोलन सुरू केले. नगर परिषद उपाध्यक्ष राहुल नैताम यांच्या नेतृत्वात एका विद्यार्थ्याने शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर सर्व पालक व विद्यार्थ्यांनी शाळेसमोर प्रशासनाविरुद्ध घोषणा दिल्या.
हेही वाचा-आल्लापल्लीत ५४ आदिवासी जोडपी विवाहबद्ध; आत्मसमर्पण केलेल्या नक्षल जोडप्यांचाही समावेशCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES