• A
  • A
  • A
गडचिरोलीत ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन

गडचिरोली - धकाधकीच्या यंत्रयुगात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. युवकांपासून ते वृध्दांपर्यंत  सर्वजण वाहनांचा वापर करतात. सुरक्षित जीवन जगण्यासाठी रस्ता सुरक्षा विषयक पालन करण्याची गरज आहे, असे वक्तव्य जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. ते ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.


हेही वाचा-आल्लापल्लीत ५४ आदिवासी जोडपी विवाहबद्ध; आत्मसमर्पण केलेल्या नक्षल जोडप्यांचाही समावेश
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली आणि पोलीस विभाग वाहतूक शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, तर प्रमुख पाहूणे म्हणून कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, सहाय्यक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक वाढीभस्मे उपस्थित होते.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रस्ता सुरक्षेविषयी माहिती दिली. आपल्या देशात रस्ते अपघातात जवळजवळ १ लाख ५० हजार नागरिकांचे प्राण जातात. प्रथम सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी हेल्मेट खरेदी करून वापरण्यास प्रारंभ करावे, असे आवाहन यावेळी रविंद्र भुयार यांनी केले. त्याबरोबरच हेल्मेट चांगल्या दर्जाचे असावे, अशी खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या प्रसंगी दिले. यावेळी रस्ता सुरक्षेचे नियम तसेच मार्गदर्शनपर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिवाय प्रत्येकाने हेल्मेट वापरावे आणि कारचालकांनी सिटबेल्टचा न चुकता वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरिक्षक शफीक उचगावकर, शितल कुंभार, सिध्दा वाघमारे, विजय राठोड, व्हि. व्हि. अहेर, हर्षल बदखल, तसेच वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार यांनी केले, तर आभार वाहतूक निरिक्षक लक्ष्मी तांबुस्कर यांनी मानले.
हेही वाचा-नसबंदीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तेलंगाणात धाव ; रुग्णांची होतेय हेळसांडCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES