• A
  • A
  • A
आल्लापल्लीत ५४ आदिवासी जोडपी विवाहबद्ध; आत्मसमर्पण केलेल्या नक्षल जोडप्यांचाही समावेश

गडचिरोली - जिल्ह्यातील ५४ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आल्लापल्ली येथे पार पडला. जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने तसेच नागपूरच्या मैत्री परिवार आणि साईभक्त मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला.


जिल्ह्यातील ५४ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी आल्लापल्ली येथे पार पडला. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात नक्षल चळवळीतून बाहेर पडलेली आणि पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलेली पाच जोडपीही विवाहबद्ध झाली आहेत.
हेही वाचा - चर्मकार समाजाकडून शिवकालीन चांभारगडावरील योद्ध्यांना मानवंदना

अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिक आर्थिक परिस्थिती अभावी आपल्या मुला-मुलींचे लग्न मोठ्या थाटामाटात करू शकत नाहीत. त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.
या सोहळ्यात प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेतील आदिवासी युवक-युवतींचे लग्न लावून देण्यात आले. यासोबतच त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्रही देण्यात आले.

हेही वाचा - अमरावतीत ५ आणि ६ फेब्रुवारीला इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल

कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अमरीश आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्‍हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग, अहेरीचे न्यायाधीश सुनील महले, प्राणहिता पोलीस मुख्यालयाचे अप्पर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई, मैत्री परिवाराचे प्रा. प्रमोद पेंडके, इतर शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES